शशिकांत
सावंत यांच्या ग्रंथवाचनाबद्दल मात्र अतिशय आदर वाटला. विशेषतः त्यांच्या
ग्रंथसंग्रहाबद्धल. यावरून आठवले जी. ए. कुलकर्णी. त्यांच्याकडेही चार-पाच
हजार पुस्तकं होती. त्यांच्या निवडक पत्रांचे खंड मी वाचले आहेत.
जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांतून ते नेहमी पुस्तकांबद्धल बोलत असत. त्यांच्या पत्रांतून ते जे सांगतात त्यावरून मला असं नेहमी वाटतं की आपणही ही पुस्तकं वाचायला हवीत. त्याप्रमाणे रँडम स्वरूपात मी त्यांनी उल्लेखिलेल्या काही लेखकांची पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न केला. पण ही फक्त एक उत्सुकता होती. त्या वाचण्याला ना काही क्रम होता ना काही शिस्त. पण आता मला असंच वाटतं की जी. ए. ज्या पुस्तकांबद्धल सांगत होते ती जी. एं. नी फक्त वाचलीच नाहीत तर त्यातली अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रही होती. जी. ए. खुद्दच सुनीताबाईंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात 'खिश्याचा आवाका सांभाळत बहुदा जुनीच अशी मी साडेचार-पाच हजार पुस्तकं तरी विकत घेतली. आणि दोन वर्षांपूर्वी सारे सोडवण्याचे ठरवले तेव्हा ती सारी विखरून टाकली. (आणि चांगली पुस्तके मोफत घ्यायलाही लोक किती नाखूष असतात हे मी शिकून घेतले)'
त्यामुळे मला आता असे वाटते त्या पत्रांमध्ये जी.एंची स्वतःची लायब्ररीच विखुरलेली आहे. त्या त्यांच्या लायब्ररीतील पुस्तकं मी नोंदवून ठेवणार आहे. आणि त्याचे एक कॅटलॉग करणार आहे. ती पुस्तकं वाचण्याचा प्रयत्न करण्याचाही माझा 'अतिशयोक्त' आणि थोडासा इम्प्रॅक्टिकल विचारही माझ्या डोक्यात सतत डोकावत असतो. असो.
जी. ए. कुलकर्णी यांच्या निवडक पत्रांचे खंड मला नेहमीच वाचायला आवडतात. जी. ए. माणूस म्हणून 'विक्षिप्त' अशी ख्याती असलेले. शक्यतो कुणाला भेटत नसत. स्वतःच्या लेखनाबद्दल ते फार साशंकच होते. आणि एका दृष्टीने हे बरोबरच होते, जागतिक साहित्य वाचलेल्या माणसाला जी.एं. च्या लेखनाच्या मर्यादा थोड्याफार कळू शकतात. मला त्यांचे लेखन आवडते. विशेषतः नंतरचे लेखन ज्यात इस्किलार, सांजशकूनच्या बऱ्याच कथा समाविष्ट केल्या जाऊ शकतात. जी. ए. बरेच एक्सपेरिमेंटल होते. त्यांच्यावर खूप वेगवेगळ्या संदर्भात लिहिले जाऊ शकते इतके ऍबस्ट्रॅक्ट आणि विरोधाभासाने भरलेले त्यांचे लेखन आहे. स्वतः जी.ए. आपल्या लेखनाबद्दल या पत्रांतून बरंच बोलतात. पण एकंदरीत हे लेखन त्यांनी आंतरिक गरज म्हणून केले, मी लेखक कमी वाचक जास्त आहे असे तेच म्हणत. आडगावी राहून गपचूपपणे त्यांनी अफाट वाचन केलं. त्यांच्याकडे चार-साडेचार हजार पुस्तकं होती. जी.एंची ही स्वतःची लायब्ररी त्यांच्या हयातीत तरी मला बघता आली नसती. एखाद्या यांची लायब्ररी

त्यामुळे
मी जी. एंची पर्सनल लायब्ररीत मुक्त विहार करणार आहे. जी. एंच्या
लायब्ररीतील पुस्तकं गोळा करणार आहे. ती येतील, जातील, काही राहतील
माझ्याकडे. पण जी. एंची पर्सनल लायब्ररी कायम माझ्या मनात राहील.
Greek Anthology - 5 Volumnes Edited by E.W. Warmington
Alice In Wonderland
(जी. एं. ची निवडक पत्रे: खंड १, पान १७-१८)
Saint
Exupery ची मात्र गोष्ट निराळी. Night Flight, The Little Prince ही
त्याची पुस्तके मी एम.ए. ला असताना वाचली होती. Wind, Sand and Stars तर
केव्हा वाचले, ते आजदेखील मला पूर्णपणे आठवते. त्यातील शैली, उत्कृष्ट
वर्णने आणि विशेष म्हणजे ती दृष्टी यामुळे मी हरकून गेलो होतो. पुष्कळशी
गावठी चित्रे पाहिल्यानंतर Rembrandt चे एक चित्र समोर येताच आपणांलाच एकदम
गावठी वाटावे, तसे मला वाटले होते. आतपर्यंत मी चार-पाच पुस्तके
वेड्याप्रमाणे गोळा केली होती. त्यांतील बहुतेक मी आता देऊन, विकून गळ्यात
बांधून फुंकून टाकली. आता जागेची अडचण आहे, Retirement ची छाया तर दाट होऊ
लागली आहे. पण थोड्या पुस्तकांत मी अद्यापही ते पुस्तक ठेवले आहे. त्या
पुस्तकातील नितळ, रेखीव चित्रांनी भारल्यासारखे होते. एक दोन अनुभव तर
mystical वाटतात. आज मला ज्यांचा पूर्णपणे हेवा वाटतो, त्यांपैकी तो एक
लेखक. अगणित चांदण्यांचे आभाळ, सतत विस्तृत होणारे क्षितिज, त्यात एका
(जुनाट) विमानाचे स्वतःचे स्वतंत्र जग, आणि त्या ठिकाणी दैनंदिन पार्थिव
गोष्टींच्या वर राहणारे त्याचे मन. ज्यातi तो पूर्ण रमून जाऊ शकला असला
व्यवसाय, आणि या अमर्याद गोष्टीचे सान्निध्य. त्याला मृत्यू आला तोही
वाळूत, चांदण्याखाली, वारा अनिर्बंध वाहत राहील अशाच ठिकाणी आणि तोदेखील
पूर्ण उचित अशाच तऱ्हेने. भग्न झालेले विमान, खंडित शरीर, असले काही
विद्रुप नाही. त्याचे शरीर तर सोडाच, त्याच्या विमानाचे अवशेषही वाळवंटात
मिळाले नाहीत. कापराची ज्योत निरंजन जळाली. एखाद्या परक्या भाषेतील
भावगीताची एकच ओळ सहज ऐकून विरून जावी, तसे त्याचे आयुष्य संपले. (म्हणजे
तो सर्वमुक्त संत होता असे नाही. तो मोजक्या मित्रांत मिसळे; काही वेळा
भांडत असे. देखण्या देहाविषयी तो अरसिक नव्हता. पण या साऱ्या गोष्टी म्हणजे
गालिच्याच्या मागच्या बाजूचे धागे. खरे Design वरच्या बाजूला होते.)
अत्यंत हावऱ्या माणसालाही यापेक्षा आयुष्यात काय जास्त हवे असणार?
आपणांला
ज्ञात असलेल्याही पलीकडील आणखी एक भीषण दरी, आणखी एक विक्राळ शिखर
दाखवणाऱ्या Dostoevsky प्रमाणे मोठा लेखक नव्हे. तर पिवळा आणि निळा असे दोन
खडे बसवलेल्या अंगठीसारख्या लेखक मनुष्याला किती जागेची गरज आहे? Saint
Exupery ला आभाळ, अमर्याद पसरलेली वाळू हेदेखील अपुरे वाटले असते. ते (The
Little Prince) मी नंतर वाचल्याने त्या वेळी त्या पुस्तकामुळे फारसा
प्रभावित झालो नाही हे खरे. कुणास ठाऊक, पण आज मला ते त्या पुस्तकाइतकेच
आवडेलही.
(जी. एं. ची निवडक पत्रे: खंड १, पान १७-१८)
The
Little Prince ला एक प्रकारचा हळवा charm आहे. सेंटचा स्पर्श झाल्यावर
थोडा ओलसर थंड सुगंध जाणवतो तसा. परंतु (क्षमा करा) त्या कथेत मला dramatic
potentialities मात्र फारशा जाणवल्या नाहीत.